औषधनिर्माणशास्त्र
औषधनिर्माणशास्त्र : औषधिद्रव्ये जमा करणे, योग्य तऱ्हेने साठवून ठेवणे, त्यांचे प्रमाणीकरण करणे, त्यांतील रासायनिक द्रव्यांचे संश्लेषण (घटकद्रव्यांपासून कृत्रिम रीतीने बनविणे), विश्लेषण व परीक्षण करणे वगैरे गोष्टी करणाऱ्या शास्त्राला औषधनिर्माणशास्त्र असे म्हणतात.